दिल्ली, १७ ऑक्टोबर, २०२२ : पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेनुसार आता शेतकऱ्यांना दिवाळीची भेट जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधी दोन हजार रुपये जमा होणार आहेत. हा शेतकरी निधीचा १२ वा हप्ता असून आता शेतकऱ्यांना तो मिळाला आहे. दोन हजार रुपये ही हप्त्याची रक्कम आहे.
केंद्र सरकारद्वारा प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना चालवली जाते. ज्यात शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अर्थात वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. ज्याचा १२ वा हप्ता पंतप्रधान मोदींनी या आठवड्यात दिला. त्यानुसार शेतकऱ्यांना मेसेज येऊन त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. तसेच त्यांनी यावेळी सांगितले की, आज १६ हजार करोड शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार करोड रक्कम जमा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
कृषी मंत्री नरेंद्र सिंह यांनी ट्विटर द्वारे सांगितले की ज्यांचा १२ वा हप्ता अडकला असेल किंवा मिळाला नसेल त्यांनी https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शेतकरी संमेलन २०२२चे उद्घाटन करण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्यांसाठी वीमा योजनादेखील जाहीर कऱण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळेल, असे मत मोदींनी व्यक्त केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस