दहशतवादाविरोधात जगाला एकत्र करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले : अनुराग ठाकूर

नवी दिल्ली, १९ डिसेंबर २०२२ : दहशतवादाचा यशस्वीपणे मुकाबला करण्यात केंद्रातील मोदी सरकार यशस्वी ठरले असून, वर्ष २०१४ पासून आतापर्यंत सहा हजार दहशतवाद्यांनी शरणागती पत्कारली आहे, असे केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी मोदी सरकारने अनेक पावले उचलली असल्याचे सांगून ठाकूर पुढे म्हणाले, की मागील आठ वर्षांच्या कालावधीत दहशतवादी घटनांमध्ये १६८ टक्क्यांनी घट झाली आहे, तर २०१४ नंतर सहा हजार दहशतवाद्यांनी शरणागती पत्कारली आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांत दहशतवादामुळे होणाऱ्या निरपराध लोकांच्या मृत्यूचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झाले आहे.

सामाजिक कल्याणाचा देखावा करीत दहशतवादाचा फैलाव करणाऱ्या पीएफआय संघटनेवर सरकारने बंदी घातली आहे. या संघटनेबरोबरच इतर कट्टरवादी संघटनांविरोधात सरकारची कारवाई यापुढेही सुरूच राहील, असेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले. दहशतवादाविरोधात मोदी सरकार शून्य सहिष्णुतेच्या भावनेने काम करीत असून, सरकारच्या निर्णायक कारवाईने अनेक ठोस परिणाम दिलेले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा