नवी दिल्ली, १५ ऑगस्ट २०२३ : आज देशभर उत्साहाचे वातावरण आहे. देशभरात आज ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. अशात उत्साह आणि चैतन्याने भरलेले आजचे वातावरण आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला गेला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतीयांच्या वतीने तिरंग्याला सलामी दिली. यावेळी लालकिल्ला परिसरात देशभक्तीने वातावरण ओसंडून वाहत असलेले चित्र दिसून येत होते.लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर देशाला संबोधित करताना नेहमी मेरे प्यारे देशवासीयों,असे म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात करण्याऱ्या पंतप्रधान मोदी यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाची सुरुवात मेरे प्यारे परिवारजण असे म्हणत केली. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरले. मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला.पंतप्रधान मोदी यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका मांडावी,अशी वारंवार मागणी केली.त्यानंतर आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदींनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर भाष्य केले.
मणिपूरमध्ये हिंसाचार झाला,अनेकांनी आपले जीवन गमावले. पण आता हळूहळू शांतता निर्माण होत आहे. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. शांततेनेच यावर तोडगा निघेल,असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशाच्या विकासावर आणि प्रगतीवर बोलताना ते म्हणाले, मी १००० वर्षांपूर्वी गोष्ट यासाठी बोलतोय कारण पुन्हा एकदा संधी आली आहे. हे अमृतकाळाच पहिल वर्ष आहे. या कालखंडात आपण जी पावले उचलू, जे निर्णय घेऊ त्याचा पुढच्या १००० वर्षावर प्रभाव पडेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आज जगात तीस वर्षापेक्षा कमी वयाची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. याच्या बळावर आपण बरेच काही साध्य करु शकतो.आता आपल्याला थांबायचे नाही, दुविधेमध्ये जगायचे नाही,गमावलेली समृद्धी परत मिळवायची आहे. आपण जे काही निर्णय घेऊ, ते पुढच्या १००० वर्षाची दीशा निर्धारित करतील. आपल्याकडे लोकशाही आणि विविधता आहे. जगातील देश वयोवृद्ध होत चालले आहेत, पण भारत युवा होत आहे. आज घेतलेल्या निर्णयाने भविष्य निश्चित होईल. सामर्थ्य देशाचे भाग्य बदलेल, आता थांबायचे नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर