गोल पोस्ट इतर राजकारण प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, १९ ऑक्टोंबर २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी, १९ ऑक्टोबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नावाने, ५११ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ करणार आहेत. ही केंद्रे महाराष्ट्रातील ३४ ग्रामीण जिल्ह्यांमध्ये स्थापन केली जातील.

ही केंद्रे ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहेत. प्रत्येक केंद्रावर सुमारे १०० तरुणांना किमान दोन व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.

हे प्रशिक्षण उद्योग, भागीदार आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल अंतर्गत समाविष्ट असलेल्या एजन्सीद्वारे प्रदान केले जात आहे. या एजन्सी क्षेत्राला अधिक सक्षम आणि कुशल मानवी कौशल्ये निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती करण्यास मदत करतील. प्रमोद महाजन हे भाजपचे प्रमुख राष्ट्रीय नेते होते आणि वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

शून्य प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

error: Content is protected !!
Exit mobile version