पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आसाम मधील १४,३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन

दिल्ली, १४ एप्रिल २०२३: नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौरा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे दिवसाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे. आज दुपारी १२ वाजता ते १४,३०० कोटी रुपयांचा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. दुपारी १२ वाजता पंतप्रधान एम्स(AIIMS) गुवाहाटी येथे पोहोचतील आणि नवीन बांधलेल्या कॅम्पसची पाहणी करती.

त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात ते AllMS गुवाहाटी आणि इतर तीन वैद्यकीय महाविद्यालये राष्ट्राला समर्पित करतील. ते आसाम अॅडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोव्हेशन इन्स्टिट्यूट (AAHII) चे उद्घाटन देखील करतील आणि पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) कार्ड वितरित करून “आपके द्वार आयुष्मान” मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. दुपारी २.१५ वाजता श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र, गुवाहाटी येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

आसाममध्ये दरवर्षी बोहाग महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (एप्रिलच्या मध्यात) साजरा केला जाणारा रंगली भिऊ साजरा केला जाणार आहे. १०,००० हून अधिक बिहू नर्तकांनी सादर केलेल्या रंगारंग बिहू कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान सार्वजनिक कार्यक्रमाच्या अध्यक्षतेसाठी गुवाहाटी येथील सरूसजाई स्टेडियमवर पोहोचतील.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नामरूपमध्ये ५०० TPD मेन्थॉल प्लांट सुरू करण्यासह विविध विकास प्रकल्पांची पाहणी करून त्याचे देखील उद्घाटन करतील. पलाशबारी आणि सुळकुची यांना जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील पुलाची पायाभरणी, रंग घर, शिवसागर यांच्या सुशोभीकरणासाठी पायाभरणी आणि पाच रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा