पंतप्रधान नरेंद्र मोदी महान देशभक्त; पुतीन यांनी केले कौतुक

मॉस्को; २८ ऑक्टोबर २०२२: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. पुतीन यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचीही स्तुती केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान देशभक्त असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मॉस्कोमध्ये वालदाई डिस्कशन क्लबच्या १९ व्या वार्षिक बैठकीत याविषयी भाष्य केले आहे. यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या स्तुतीची सध्या मीडियामध्ये जोरदार चर्चा होत आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा लोकांपैकी एक आहेत, जे स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवण्यास सक्षम आहेत. ते खरे देशभक्त आहेत. आपल्या लोकांच्या हिताचे रक्षण कसे करायचे ? हे त्यांना चांगलेच माहीत आहे. अनेक देशांनी आणि लोकांनी भारतावर अनेक निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला, पण एवढे करूनही मोदींनी भारतावर कोणतेही निर्बंध लादण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. भारताने विकासात अतुलनीय यश मिळवले आहे, आणि भारताला खूप चांगले भविष्य आहे.

आमच्यात एक खास नाते

पुतीन पुढे म्हणाले, भविष्य भारताचे आहे. सर्वात मोठी लोकशाही असल्याचा अभिमान मोदींना वाटू शकतो आणि आमचे विशेष नाते आहे. आमच्यात एक खास नाते आहे., असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आमच्या दोन राष्ट्रांमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावरुन तसंच व्यापारी संबंधही चांगलेच सुधारले आहेत.

यावेळी पुतीन यांनी अमेरिका आणि त्यांच्या सहकारी राष्ट्रांना लक्ष्य करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्याकडून फार घाणेरडं आणि धोकादायक राजकारण सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा