पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरोशिमाला रवाना, G-7 परिषदेत सहभागी होणार

नवी दिल्ली, १९ मे २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून जपानच्या अध्यक्षतेखालील जी ७ शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी हिरोशिमा, जपानला रवाना झाले आहेत. परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप उत्सुक आहेत. त्यांनी जपानला रवाना होण्यापूर्वी ही माहिती दिली आहे. जपानच्या हिरोशिमा शहरात आजपासून जी-७ सदस्य देशांची बैठक सुरू होणार आहे.

दक्षिण चिनी समुद्रासह हिंद महासागरातील चीनच्या विस्तारवादा विरुद्ध तसेच वाढत्या आर्थिक प्रभावाविरुद्ध या बैठकीत धोरण आखले जाईल. सर्व देश मिळून एक संयुक्त निवेदनही जारी करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणले आहे की, या जी-७ शिखर परिषदेत माझी उपस्थिती विशेष अर्थपूर्ण असणार आहे. कारण यावर्षी जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे आहे.

मी जी-७ देश आणि इतर आमंत्रित भागीदारांसोबत जगासमोरील आव्हाने आणि त्यांना एकत्रितपणे हाताळण्याची गरज यावर विचारांची देवाणघेवाण करण्यास उत्सुक आहे. हिरोशिमा जी-७ शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या काही नेत्यांसोबत मी द्विपक्षीय बैठकाही घेणार आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा