पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली विरोधी पक्षनेत्यांची भेट

नवी दिल्ली, ६ डिसेंबर २०२२ : भारताचे ‘जी-२०’ अध्यक्षपद ही संपूर्ण जगाला देशाची ताकद दाखवण्याची अनोखी संधी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले. यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “जगातील २० प्रमुख अर्थव्यवस्थांचा समूह असलेल्या ‘जी-२०’चे अध्यक्षपद संपूर्ण राष्ट्राचे आहे.”

‘आज भारताविषयी जागतिक कुतूहल आणि आकर्षण आहे; जे या प्रसंगाची क्षमता आणखी वाढवते,’ असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले.

पंतप्रधानांनी संघटित होऊन काम करण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि विविध ” कार्यक्रमांच्या संघटनेत सर्व नेत्यांचे सहकार्य मागितले.

‘जी-२०’ अध्यक्षपदामुळे भारतातील काही भाग पारंपरिक महानगरांच्या पलीकडे प्रदर्शित करण्यात मदत मिळेल आणि देशातील विविध क्षेत्रांचे वेगळेपण समोर येईल, असेही मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवले.
वर्षभर चालणार्‍या कार्यक्रमांदरम्यान मोठ्या संख्येने अभ्यासक भारतात येणार असल्याचे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी ” बैठका आयोजित केल्या जाणाऱ्या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या योजनेवर प्रकाश टाकला.

भाजपचे जे. पी. नड्डा, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, ‘टीएमसी’च्या ममता बॅनर्जी, ‘बीजेडी’चे नवीन पटनायक, ‘आप’चे अरविंद केजरीवाल, वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी, ‘सीपीएम’चे सीताराम येचुरी, ‘टीडीपी’चे एन. चंद्राबाबू आदींसह विविध पक्षांचे नेते बैठकीत सामील होते. तर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, एस. जयशंकर, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी आणि भूपेंद्र यादव हेही या बैठकीला उपस्थित होते. त्याचप्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या उपस्थितीत भारताच्या जी-२० प्राधान्यक्रमांच्या पैलूंचे तपशीलवार सादरीकरणही करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा