गोल पोस्ट महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत, नांदेडवरून चेन्नईला रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत, नांदेडवरून चेन्नईला रवाना

नांदेड ४ मार्च २०२३ : श्री. गुरु गोविंदसिंघजी नांदेड विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास आदीलाबादवरून आगमन झाले. विमानतळावर मान्यवरांनी स्वागत केल्यानंतर लगेच त्यांनी विशेष विमानाने चेन्नईकडे रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणातील आदीलाबाद येथील एका सार्वजनिक सभेसाठी आज सकाळी नागपूर येथून हेलिकॉप्टरने उपस्थित झाले होते. त्याच हेलिकॉप्टरने ते नांदेड विमानतळावर आले. नांदेडवरून विशेष विमानाने ते चेन्नईकडे रवाना झाले आहेत.

विमानतळावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, खा.डॉ.अजित गोपछडे, आ. रामपाटील रातोळीकर,आ. तुषार राठोड,आ. राजेश पवार, आ.श्यामसुंदर शिंदे, आ. बालाजी कल्याणकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गौतम कांबळे

error: Content is protected !!
Exit mobile version