गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय फ्रान्स दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पुराचा आढावा, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

फ्रान्स दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पुराचा आढावा, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

नवी दिल्ली, १७ जुलै २०२३ : देशाची राजधानी सध्या मुसळधार पावसामुळे यमुना नदीला आलेल्या पुरात अडकली आहे. जोरदार पावसामुळे यमुना नदी धोक्याची पाणी पातळी ओलांडून वाहत आहे.त्यामुळे संपूर्ण दिल्ली जलमय झाली आहे. पाण्याची पातळी आता कमी होत असली तरी देखील अनेक भागात पाणी साचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री फ्रान्स दौऱ्यावरून परतल्यानंतर उपराज्यपाल विनय सक्सेना यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यांनी दिल्लीतील पुराची माहिती घेतली.

पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरून येताच, दिल्लीला परतल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पीएम मोदी फ्रान्स आणि यूएईच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावरून परतले आहेत.पंतप्रधान मोदी दिल्लीत पोहोचताच त्यांनी दिल्लीच्या उपराज्यपालांना फोन करुन माहिती घेतली. दिल्लीतील पूरस्थितीची सविस्तर माहिती घेऊन सुरू असलेल्या प्रयत्नांची संपूर्ण माहिती घेतली. केंद्र व राज्याच्या सहकार्याने जनतेच्या हिताची सर्व कामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

शनिवारी यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाली असली तरी दिल्लीतील अनेक भागात पूरस्थिती कायम आहे. यामध्ये यमुना बाजार, लाल किल्ला, आयटीओ, बेला रोड आणि परिसरात अजूनही पाणी साचले आहे. सध्या एनडीआरएफच्या १६ तुकड्या बचावकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.शनिवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. यासोबतच हवामान विभागाने ने आजही पावसाचा इशारा दिला आहे. दिल्लीसह हिमाचल, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान यासह सुमारे २० राज्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version