गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार UNSC मध्ये जागतिक सुरक्षा-शांतता बैठकीचे नेतृत्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार UNSC मध्ये जागतिक सुरक्षा-शांतता बैठकीचे नेतृत्व

नवी दिल्ली, ३ ऑगस्ट २०२१: भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सागरी सुरक्षा, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा या विषयावरील महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील. भारत सलग तीन उच्चस्तरीय बैठका घेईल, ज्यात सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि जागतिक शांतता यासारख्या विषयांवर गंभीर चिंतन होईल.

९ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षा परिषदेच्या या आभासी बैठकीत सहभागी होतील. भारतीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ असेल. भारतासाठी हे मोठे राजनैतिक यश आहे. आशियात भारताच्या वाढत्या उंचीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

भारताचा दहशतवादविरोधी अजेंडा सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत जागतिक दहशतवादाविरोधात पंतप्रधान मोदींच्या या महत्त्वाच्या बैठकीत आवाज उठवला जाईल. यासह, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेबाबतही देशांचे मत घेतले जाईल, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची रणनीती तयार करता येईल.

भारत ३ उच्चस्तरीय बैठका घेणार

रविवारी माहिती देताना संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले की, भारत तीन उच्चस्तरीय बैठका घेईल, ज्यात शांतता राखणे, दहशतवादाविरोधात कारवाई आणि सागरी सुरक्षेसारखे गंभीर मुद्दे उपस्थित केले जातील.

सभेचे अध्यक्ष असलेले पहिले पंतप्रधान मोदी

संयुक्त राष्ट्राचे भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी रविवारी सांगितले की, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील, ज्यांनी UNSC बैठकीचे अध्यक्षत्व घेण्याचा निर्णय घेतला आहे. UNSC मध्ये ही आमची आठवी टर्म आहे.

भारताला सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्यत्व

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही. सुरक्षा परिषदेमध्ये एकूण १५ देशांचा समावेश आहे, त्यापैकी १० अस्थायी सदस्य आहेत. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत. जानेवारी २०२१ पासून सुरू होणारा भारताचा कायमस्वरूपी सदस्य म्हणून २ वर्षांचा कार्यकाळ आहे. भारताला सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य बनवण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version