अहमदाबाद, २८ डिसेंबर २०२२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हीराबेन मोदी यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, हिराबेन मोदी यांनी १८ जून रोजीच आपला १०० वा वाढदिवस साजरा केला होता. तर, पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेटही घेतली होती.

  • पंतप्रधान मोदी जाणार अहमदाबादला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी आपल्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अहमदाबादला रवाना होणार आहेत. तर थोड्याच वेळात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल दवाखान्यात जाणार असून प्रशासनाकडून दवाखान्याच्या आजूबाजूच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा