पीएफआयच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पटणा रॅली, NIAच्या चौकशीत मोठा खुलासा

नवी दिल्ली, २४ सप्टेंबर २०२२: केरळमधून अटक करण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) सदस्य शफिक पैठची राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) चौकशी केली आहे. यामध्ये मोठा खुलासा झाला आहे. शफीफ पैठने एनआयएला सांगितले की, त्यांचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पटणा रॅली होती. शरीफ यांच्या म्हणण्यानुसार, पीएफआय नेत्यांना रॅलीदरम्यान वातावरण बिघडवायचे होते. त्यासाठी बॅनर-पोस्टर्सही लावण्यात आले होते.

एनआयएने केलेल्या चौकशीत शफीकने सांगितले की, यावर्षी १२ जुलै रोजी पटना येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली होती. ही रॅली पीएफआयच्या निशाण्यावर होती. एका वर्षात पीएफआयच्या खात्यात सुमारे १२० कोटी रुपये जमा झाल्याचेही तपासादरम्यान आढळून आले आहे. यासोबतच खात्यात जमा झालेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम रोख स्वरूपात जमा करण्यात आली.

परदेशातून येत होता निधी

ही कोट्यवधी रुपयांची रक्कम केवळ भारतातील विविध शहरांतूनच नव्हे तर परदेशातूनही जमा करण्यात आल्याचे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे. हा पैसा देशविरोधी कारवायांसाठी वापरला जात होता.

एनआयएने केली होती केरळमधून २२ जणांना अटक

या कारवाईदरम्यान देशातील अनेक भागातून १०६ जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले बहुतांश केरळमधील होते. एनआयएने केरळमधून २२ जणांना अटक केली. पीएफआयने आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी आधीच अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. ज्याद्वारे पीएफआयने देशात आपला अजेंडा सुरू ठेवण्यासाठी संपूर्ण योजना तयार केली होती. मात्र, यंत्रणांना याची माहिती मिळताच त्यांनी त्याचा भांडाफोड केला.

माहितीनुसार, पीएफआयने एक-दोन नव्हे तर अर्धा डझनहून अधिक अशा संस्था तयार केल्या आहेत. अंतर्गत सुरक्षा कार्यालयाच्या उच्च-स्तरीय कागदपत्रांनुसार, या संघटना सरकारी एजन्सीच्या निर्बंधांपासून दूर राहण्यासाठी आणि दहशतवादी अजेंडा पसरवण्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत.

अटकेविरोधात पुकारण्यात आला संप

NIA छापे आणि लोकांना अटक करण्यासाठी PFI ने शुक्रवारी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत केरळमध्ये संप पुकारला होता. पीएफआय नेतृत्वाने सांगितले की, राज्यातील त्यांच्या नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ संपाची घोषणा करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा