भारतानं गुंतवणूकीसाठी सर्वात उत्तम देश म्हणून स्थान मिळवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

4

नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर २०२०: भारतानं गुंतवणूकीसाठी सर्वात उत्तम देश म्हणून स्थान मिळवलं आहे. असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.ते आज जागतिक गुंतणूकदारांच्या व्हर्चुअल गोलमेज परिषदेत बोलत होते. गुंतवणूकदारांना व्यापारासाठी अनुकूल स्थिती हवी आहे.

ती निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले आहे, भारतातल्या विविधतेमुळे अनेक बाजरपेठा उपलब्ध होतात.त्यामुळे केवळ मोठ्या शहरांमध्येचं नव्हे तर छोट्या शहरांमध्येही गुंतवणूक येत आहे, असं त्यांनी सांगितलं.

आत्मनिर्भर भारत ही केवळ एक दृष्टी नसून सुनियोजित आर्थिक रणनीती आहे, असं मोदी म्हणाले. कोरोनाच्या काळात भारतानं कटीबद्धता दाखवून दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा