पुणे, दि. ८ सप्टेंबर २०२०: बारामती तालुक्यातील कोरोना बधितांसाठी मेडिकल हॉस्पिटल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत व माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजच्या हाॅस्टेलमध्ये कोविड सेंटरची व्यवस्था केली आहे. तर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डी सी एच सी) रुई हॉस्पिटल व सिल्व्हर जुबली हॉस्पिटल ध्ये व्यवस्था आहे. तर डेडिकेटेड सेंटर हॉस्पिटल (डी सी एच) म्हणून बारामती हॉस्पिटल आहे.
बारामती शहरातील ४१ खाजगी हॉस्पिटलमधील ११४ बेड, तर कोविड केअर सेंटर मेडिकल कॉलेज येथे २७० बेड, तर डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे १०० बेड, माळेगाव कॉलेजच्या होस्टेलमध्ये १६८ बेड व प्रेरणा महिला शासकीय वसतिगृहात १००, रुई हॉस्पिटल येथे ३० तर सिल्व्हर जुबली हॉस्पिटल (डी सी एच सी) येथे ७० कोविड रुग्णांच्या तर ३० लक्षण असणाऱ्या रुग्णांचे बेड आहेत.
प्रत्येक कोविड सेंटर मध्ये पॉझिटिव कोविड रूग्णांना घरून आणण्यासाठी ऍम्ब्युलन्सची व्यवस्था आहे. तर कोविड सेंटरमधील रुग्णांना नाष्टा, चहा,दोन्ही वेळचे उत्तम दर्जाचे जेवण त्या रुग्णाची परिस्थिती बघून त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जातात, तर त्यांना इथे मोफत औषध दिले जाते आहे. बारामती शहरातील कोविड सेंटरमध्ये पुरेसा स्टाफ आहे. यामध्ये जिल्हा परिषदेने तालुक्याला १०५ जास्तीचा स्टाफ दिला आहे. यामध्ये डॉक्टर, सिस्टर, वार्डबॉय, लॅब टेक्निशियन यांचा समावेश असून सर्व स्टाफ हा अनुभवी व हुशार आहे.
शहरात एकुण बारामती मधील सिल्व्हर जुबली हॉस्पिटलमध्ये ६, रुई हॉस्पिटलमध्ये ६, खाजगी हॉस्पिटलमध्ये १० व्हेंटिलेटर असून सध्या शहरातील १० कोविड रुग्ण व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत.
व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन यंत्रणा ऑपरेट करणारे सर्व त्या क्षेत्रातील अनुभवी व पारंगत आहेत. तर तालुक्यातील कोविड रूग्णांना तातडीची व योग्य सेवा मिळत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी