कर्ज घेतलेल्या व्यावसायिकांना खासगी कर्ज देणाऱ्या कंपनीची अरेरावी

लोणी काळभोर, दि.२३ मे २०२० : कोरोना महामारीमुळे सध्या देशभरात आर्थिक मंदीचं सावट आहे. त्यात छोट्या व्यावसायिकांना भारतीय रिझर्व्ह बँकेनं कर्जदारांना पुढील तीन महिन्यांसाठी लोन किंवा EMI भरण्यास मुभा दिली आहे. त्यातच काही खाजगी कंपन्या मात्र छोट्या व्यवसायिकांना त्रास देताना दिसत आहे. असाच एक प्रकार लोणी काळभोर परिसरातून समोर आला आहे.

एका रिक्षाचालकाला बजाज फायनांन्स कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याने शुक्रवारी(दि. २२) फोन करून अरेरावी केली. त्यामुळे तो छोटा व्यावसायिक टेंन्शनमध्ये आला आहे. ज्याने खाजगी लोन घेतले आहे. त्यांना मात्र, याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या कर्जबाजारी व्यावसायिक अडचणीत सापडला आहे.

छोटे व्यावसायिक कमी पैशात आपला व्यवसाय उभारतात. तर यातील अनेक जण भाड्याने रिक्षा चालवून आपला व्यवसाय करत असतात. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या अगोदर EMI भरण्यात दिलेला दिलासा आणखी तीन महिन्यांनी वाढविला आहे. यामुळे ऑगस्टपर्यंत EMI नाही भरता आला तरीही त्याचा दंड किंवा क्रेडिट रिपोर्टवर परिणाम होणार नाही. यामुळं कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. व त्यातच आशा अरेरावी करणाऱ्या खाजगी लोन कंपन्यांना मात्र कोण सांगणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा