नवी दिल्ली, दि. १९ जुलै २०२०: रेल्वेमधील खासगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने पात्रता विनंती (आरएफक्यू) १०९ जोड्या खाजगी गाड्या चालविण्यास सांगितले. यामुळे रेल्वेमध्ये गुंतवणूक वाढेल आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील असे सरकारचे म्हणणे आहे.
या खाजगी रेल्वे गाड्या कधी चालू होतील याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या चालू आहेत. विविध प्रसारमाध्यमांवर सुरू असलेले हे कायास थांबवण्यासाठी रेल्वेने विधान जारी केले आहे की, या अत्याधुनिक रेल्वे गाड्या २०२३ पर्यंत रुळावर धावतील.
भारतीय रेल्वेने सांगितले की, मार्च २०२३ पासून खासगी गाड्या चालविण्याचे नियोजित आहे. यासंदर्भातील निविदांना मार्च २०२१ पर्यंत अंतिम केले जाईल आणि मार्च २०२३ पासून गाड्या चालविण्यात येतील. वास्तविक, भारतीय रेल्वे १०९ जोड्या खाजगी रेल्वे चालवण्याच्या तयारीत आहे. खासगी गाड्यांमधील विमान कंपन्यांप्रमाणेच प्रवाशांना पसंतीची जागा, सामान आणि प्रवासाची सुविधा देण्यात येईल. यावेळी, प्रवाशांना तिकिटांव्यतिरिक्त या सुविधांसाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील.
प्रत्येक रेल्वे मध्ये सोळा डबे असतील. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार यातील बऱ्याचश्या रेल्वे गाड्या भारतात मेक इन इंडिया च्या अंतर्गत बनवल्या जातील. महत्त्वाचं म्हणजे यातील प्रायव्हेट कंपन्या या गाड्यांमधील मेंटेनेंस, वाहतूक आणि खरेदीसाठी जबाबदार राहतील.
या रेल्वेगाड्यांची बनावट अशी असेल की या प्रतितास १६० किलोमीटर वेगाने धावतील. रेल्वेच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पासाठी अतिरिक्त कालावधी ३५ वर्षे असेल. गाड्या चालवणारे खासगी युनिट वास्तविक वापराच्या आधारे विजेसाठी भारतीय रेल्वेला वाहतुकीचे शुल्क देतील.
रेल्वे मंत्रालयाला या उपक्रमांमधून अशी अपेक्षा आहे की या अंतर्गत भारतीय रेल्वे मध्ये जवळपास ३० हजार कोटींची गुंतवणूक येईल. यामागचा रेल्वे मंत्रालयाचा उद्देश आहे की या आधारे रेल्वेमध्ये नवीन तंत्रज्ञान येईल ज्यामुळे रेल्वेच्या मेंटेनेस मध्ये येणाऱ्या खर्चात कपात होईल. तसेच याबरोबर नवीन रोजगार निर्मिती देखील होईल. याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेतेमध्ये देखील भर पडेल. तसेच प्रवाशांना जागतिक स्तरावरील सुविधांचा अनुभव देखील अनुभवायला मिळेल. भारतीय रेल्वेच्या जाळ्यांमध्ये(नेटवर्कमध्ये) पॅसेंजर रेल्वे गाड्यांसाठी खाजगी गुंतवणूक आणण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी