लोणी काळभोर, दि. १० सप्टेंबर २०२०ः सरकार आणि शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या सर्व संस्था आणि खासगी विद्यापीठ यांच्यात सुसंवाद नसल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. विद्यार्थी केंद्रित धोरण ठेवूनच सरकार आणि शिक्षण संस्थांनी कार्य करावे लागणार आहे. पेरा या खासगी विद्यापीठांच्या संघटनानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि आत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमीच घेतल्यास देशात नवीन शिक्षण धोरणासंदर्भातील सकारात्मक पाऊल टाकल्याचा संदेश देशभर जाईल. नवीन शिक्षण धोरण राबवित असताना खासगी विद्यापीठांच्या प्रतिनिधींची नियुक्ती यासंबंधीच्या समितीत करण्याचा आमचा मानस आहे. शासन नेहमीच खासगी विद्यापीठांच्या संवाद ठेवून काम करेल, असे मत महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी मांडले.
‘पेरा’ प्रिमीन्यंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन या खासगी विद्यापीठांच्या संघटनेकडून बुधवारी ता. ९ व्हर्च्युअल एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले होते. याच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पेरा संघटनेचे अध्यक्ष आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, उपाध्यक्ष भरत अग्रवाल, डॉ. स्वाती मुजमदार, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. संदीप झा, एन. टी राव, डॉ. आश्विन कुमार शर्मा, डॉ. व्ही. ए. रायकर, डॉ. एकनाथ खेडकर, डॉ. संजीवन अरसुड, डॉ. सायली गणकर, डॉ. प्रभात रंजन, डॉ. मनीमाला पुरी, डॉ. मिलिंद पांडे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. उदय सामंत म्हणाले, राज्यात खासगी विद्यापीठांची २०१४ साली स्थापना झाली. यानंतर या विद्यापीठांनी स्वत:ची ताकद वापरून देशातील शैक्षणिक क्षेत्रात एक भरीव कामगीरी केली आहे. कोरोना संकट सगळीकडे असून त्यावर मात करत महाराष्ट्रातील विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या प्रग्लभ झाले पाहिजे. पेरा संघटनेकडून आयोजित एज्युकेशन फेअर महाराष्ट्राच्या जडणघडणीला वेगळी दिशा देणार ठरेल. सरकार आणि संघटनांनी हातात हात घालून काम करावे लागणार आहे. खासगी विद्यापीठांच्या अनेक अडचणी आहेत, मात्र कोरोनाचे संकट असल्यामुळे त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाहीत. भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देत असताना संस्था चालकांना चांगल्या वातावरणामध्ये संस्था चालवली पाहिजे. त्यालाच पूरक नियम आणि बंधन सरकारचे असले पाहिजे. जीआर काढल्यानंतर मागे घेणारा मंत्री नसून कोणतेही नियम जाचक असून या मताचा मी आहे.
राज्यात लवकरच व्हर्टिकल युनिव्हर्सिटी ही संकल्पना
राज्यात शासकीय वा खासगी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागा हवी, ही महत्त्वाची अट असते. राज्य सरकारने त्याचा नव्याने विचार करण्याचे ठरवले आहे. राज्यात व्हर्टिकल युनिव्हर्सिटी ही संकल्पना राबविण्याचा विचार असून, त्यात जागेची अट असणार नाही, त्यामुळे नव्या विद्यापीठांच्या स्थापनेचा मार्ग सुलभ होणार आहे, असे प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले. महाराष्ट्राचे देशात उच्च शिक्षणात वेगळे स्थान आहे. राज्याने देशाला उच्च शिक्षणातील मॉडेल दिले आहे. खासगी विद्यापीठाची पॉलिस करून सरकाराने उच्च शिक्षणात योगदान दिले आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार काही परदेशी विद्यापीठांना भारतात येण्याची परवानगी दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांसोबत आमची स्पर्धा आहे. भविष्यातील बदलाची नांदी ओळखून बेस्ट प्रॅक्टिस पेक्षा नेक्स्ट प्रॉक्टिससाठी आम्ही कार्य करत राहू. थिंक टँक बनून राज्याच्या उच्च शिक्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
डॉ. भरत अग्रवाल म्हणाले, खासगी विद्यापीठांचा राज्य सरकारच्या विचारापलीकडे जाऊन अधिक काम करण्याचा आमचा मानस आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंत्रलायाकडून सहकार्य मिळत राहवे. भविष्यात पेरा ही संघटना विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि त्यांना योग्य करिअर मार्गदर्शनासाठी काम करत राहिल. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी प्रस्तावना केली. प्रा. अशोक घुगे, प्रा. स्वप्निल सिरसाठ यांनी सूत्र संचालन केले. प्रा. डॉ. प्रभात रंजन यांनी आभार व्यक्त केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे