हाथरस, ४ ऑक्टोंबर २०२०: काँग्रेसच्या माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना योगी आदित्यनाथ सरकारने हाथरस येथे जाण्यास काल परवानगी दिली होती. राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यासह आणखीन पाच जणांना हा त्रास येथे जाण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या आईची गळाभेट घेतली. दरम्यान बंद खोलीमध्ये परिवारासोबत दोघांनीही चर्चादेखील केली. प्रशासनानं राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना काही अटींवर हातरस येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेण्यास परवानगी दिली होती.
मास घालने आणि धोरणाशी संबंधित इतर प्रोटोकॉल सह प्रशासनाने राहुल गांधी व व प्रियंका गांधी यांना हाथरस मध्ये जाण्यास परवानगी दिली होती. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी देखील यूपी सरकारनं काही अटी ठेवल्या होत्या. तत्पूर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ३५ खासदारांच्या शिष्टमंडळासह हाथरसकडं रवाना झाले. यूपी पोलिसांनी डीएनडीवर सुरक्षा उपाय ठेवले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या काही गाड्या देखील यावेळेस खराब झाल्या होत्या. त्यामुळं गर्दीची समस्या देखील निर्माण झाली होती.
उपायुक्त रणवीर सिंग यांच्यासमवेत नोएडाचे जॉइंट सीपी लव्ह कुमार राहुल गांधी यांच्याशी बोलले. डीएनडी येथे पोहोचलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही नियम व कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केलं. दुसरीकडं, उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांना राजधानी लखनऊमध्ये अटक करण्यात आली आहे. लखनऊच्या बहुलखंडी येथील त्यांच्या घराजवळ चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे