नवी दिल्ली: सरकारकडून झालेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आणि देश बाहेरील काही वादांमुळे सध्या आर्थिक मंदीच्या सावट उभे राहिले आहे. जीएसटी आणि नोटबंदी मुळे देशातील अनेक व्यापाऱ्यांना व कंपन्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यातच महागाईने आकाशाला गवसणी घातल्याने काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अशी टीका करत असताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, भाजप सरकारने लोकांचा खिसा कापून त्यांच्या पोटावर पाय दिलाय.
अशी टीका त्यांनी ट्विटरवरून केले. याच बरोबर प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भाजीपाला आणि खाण्याच्या पदार्थांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. भाज्या, तेल, डाळ आणि पीठचे दरही वाढले असून गरिबांनी काय खावं?, असा सवाल करतानाच मंदीमुळे लोकांच्या हातातील रोजगार गेला आहे. त्यांना कामही मिळेनासं झालं आहे, असं प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
याचबरोबर प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनीही आकडेवारीच्या आधारे सरकारला निशाण्यावर धरले आहे. अपूर्ण मॅनेजमेंटचं एक सर्कल पूर्ण झालं आहे. मोदी सरकार जुलै २०१४ मध्ये सत्तेत आलं तेव्हा महागाई दर ७.३९ टक्के होता. डिसेंबर २०१९मध्ये हा दर ७.३५ टक्के इतका झाला आहे, अशी खोचक टीका चिदंबरम यांनी केली आहे. खाण्याच्या पदार्थांचे भाव १४.१२ टक्क्याने वाढले आहेत. भाजीपाल्याचे दर ६० टक्क्याहून अधिक झाले आहेत. कांदा १०० रुपये किलो विकला जात आहे. याच अच्छे दिनचं भाजपने जनतेला आश्ववासन दिलं होतं, अशी टीकाही त्यांनी केलीय.