सोशल मीडियावर प्रियांका चोप्राच्या “त्या” फोटोची चर्चा

दिल्ली : बाॅलिवूडची अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांका नेहमीच लाईमलाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता तिचा पती निक जोनस व प्रियांका दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. “ग्रॅमी२०२०” अॅवार्ड कार्यक्रमात जे आऊटफिट प्रियांका घालून आली होती, त्या आऊटफिटमुळे सर्वत्र धुमाकूळ उडाला आहे.

प्रियांकाने या कार्यक्रमातील फोटो इन्स्टांग्रामवर शेअर करताच सोशल मिडीयावर एकच चर्चेला उधाण आले. या कार्यक्रमातील सर्वांचीच नजर प्रियांकाच्या आऊटफिट्मुळे तिच्याकडे खेचली जात होती. या ड्रेसमुळे तिने सर्वच अभिनेत्रींना मागे सोडले आहे.

प्रियांकाने काही तासांपूर्वीच आपल्या इन्स्टांग्रामवर अकाउंटवर या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘This guy. #Grammys2020’ हे तिचे फोटो सोशल मिडीयात सध्या खुप चर्चेत आहेत. तिचे फॅन्सची मोठी पसंती या फोटोंना मिळत आहे.
ग्रॅमीच्या रेड कार्पेटवर प्रियांकाने आपला जलवा दाखविला आहे. याचीच सध्या जोरदार चर्चा आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा