मुंबई , ३१ जानेवारी २०२३ : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्रींचे चाहते कामाप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाच्या क्षणांचे साक्षीदार असतात. अशीच बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या मुलीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. प्रियांकाने मालती मेरी हिच्या जन्माची घोषणा केल्यापासून ते ती भारतात येऊन गेली तरीही मुलीचा चेहरा दाखवला नव्हता; पण आता खुद्द प्रियांकानेच एका व्हिडिओमधून तिचा चेहरा स्पष्ट दाखविला आहे.
अनेक चाहत्यांनी प्रियांकाकडे सतत मालती मेरीची एक झलक दाखवा, अशी मागणी केली होती. हीच मागणी पूर्ण करीत प्रियांकाने एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान तिची मुलगी मालती मेरी हिचा चेहरा समाजमाध्यमांद्वारे दाखविला आहे. यानंतर मालती मेरी अन् तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. निक जोन्स आणि त्यांच्या भावांसाठी हॉलिवूड बॉक्स फिल्मस्टार पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रियांका आणि मालती मेरी पुरस्कार सोहळ्यात पोचले.
https://www.instagram.com/p/CoDbBzhSN11/?igshid=MDM4ZDc5MmU=
त्याच सोहळ्यातील हे फोटो व्हायरल होत असून, चाहते देखील मायलेकींच्या फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. स्वतः प्रियांकाने क्रिम रंगाचा स्वेटर आणि पांढऱ्या रंगाच्या टॉप मधील गोंड्स मालती मेरीचा मांडीवर खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. मालती पहिल्यांदाच सार्वजनिक स्थळी पाहायला मिळाली. तेथील माणसांना पाहत आनंदात असतानाचे तिचे फोटो व्हायरल झाले. प्रियांकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये निकने त्याच्या भाषणात लेकीचे नाव घेताच मालती त्याच्याकडे बोट दाखवीत मांडीवर उभी राहिली. या व्हिडिओमधून मालती, प्रियांका आणि निक यांच्यातील नाते दिसून येत असून, चाहत्यांकडूनही मालतीला प्रचंड प्रेम मिळत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे.