यूपीतील दारूण पराभवावर प्रियांका यांची प्रतिक्रिया, हे सांगितले पराभवाचे कारण

नवी दिल्ली, 11 मार्च 2022: यूपी निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. दोन तृतीयांश बहुमताने पक्ष पुन्हा सत्तेत येणार आहे. आता भाजपने विजयाची नोंद केली असून, या निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेस 403 पैकी केवळ 2 जागांवर आघाडीवर आहे. आता या निकालावर प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियांका यांनी ट्विट करून लिहिले की, लोकशाहीत जनमत हे सर्वोपरि असते. आमच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी कष्ट केले, संघटना उभी केली, जनतेच्या प्रश्नांवर लढा दिला. पण, आम्ही आमच्या मेहनतीचे मतात रूपांतर करू शकलो नाही. काँग्रेस पक्ष सकारात्मक अजेंडा घेऊन उत्तर प्रदेशच्या भल्यासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी संपूर्ण जबाबदारीने संघर्ष करणाऱ्या विरोधकांचे कर्तव्य पार पाडत राहील.

आता प्रियांका गांधींनी यूपी निवडणुकीत महिला शक्तीवर पूर्ण भर दिला होता. 50 टक्के जागाही केवळ महिला उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. मात्र पक्षाचा हा डाव त्यांच्यावरच उलटल्याचे निवडणूक निकालावरून दिसून आले आहे. पक्षाची मतांची टक्केवारी दोन टक्क्यांच्या आसपास राहिली असून केवळ दोनच जागा मिळताना दिसत आहेत. यूपीशिवाय पंजाबमध्येही काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. तिकडे आम आदमी पक्षाच्या झंझावाताने त्यांचा सफाया केला आहे. पंजाबमध्ये आप 92 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस केवळ 18 जागांवर आघाडीवर आहे. चरणजितसिंग चन्नीही त्यांच्या दोन्ही जागांवर पिछाडीवर आहेत, नवज्योतसिंग सिद्धू यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि इतर अनेक दिग्गजांनाही जागा गमवावी लागली आहे.

तर चरणजित सिंह चन्नी यांनीही पंजाबच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. चरणजीत सिंह चन्नी यांनी निवडणूक निकालावर ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, मला पंजाबच्या जनतेचा जनादेश मान्य आहे. विजयासाठी मी आप आणि भगवंत मान यांचे अभिनंदन करतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा