पुणे, ३० डिसेंबर २०२०: कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी आपल्या पुणे महानगर पालिकाच्या वतीने महापालिकेच्या शाळा तसेच खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या अंतर्गत शालेय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या सभागृहात या अंतर्गत शालेय स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कोरोना संकट दूर करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतः नियम पाळणे, स्वतःला स्वयंशिस्त लावून घेतली तर हे संकट लवकर दूर होईल, असे ते म्हणाले.
याप्रसंगी उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष श्री हेमंत रासने, नगरसेविका श्रीमती सुनीताताई गलांडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त (वि) सुरेश जगताप, शिक्षण अधिकारी शिवाजी दौंडकर तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण ५०० महानगरपालिका व खासगी शाळांतील सुमारे ३६०० स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल शिक्षण विभागातील व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सहकारी व विद्यार्थ्यांचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कौतुक केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे