‘योध्दा @ ८० वक्तृत्व स्पर्धा २०२०’ ऑनलाइन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पुणे, 3 जानेवारी २०२१: आज वानवडी (पुणे) येथे आदरणीय साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने ‘योध्दा @८० वक्तृत्व स्पर्धा २०२०’ ऑनलाईन आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज संपन्न झाला.

रयत शिक्षण संस्था, पश्चिम विभाग व आण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय संपन्न झालेल्या ‘योध्दा @ ८० वक्तृत्व स्पर्धा २०२०’ चे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, रयत शिक्षण संस्था सातारा चे व्हाईस चेअरमन मा.भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौंन्सिलचे सदस्य मा.रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्था सातारा चे उपाध्यक्ष आ.चेतन तुपे, रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग चेअरमन मा.राम कांडके तसेच सर्व जनरल बॉडी सदस्य, समन्वय समिती सदस्य, प्राचार्य व शिक्षक वृंद, पारितोषिक विजेते विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा