खलिस्तान समर्थकांनी दिल्लीत मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिल्या, जी-२० परिषदेपूर्वी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली, २७ ऑगस्ट २०२३ : जी-२० परिषदेपूर्वी दिल्लीत खलिस्तान समर्थक घोषणा देण्यात आल्या. खलिस्तान समर्थकांनी दिल्लीतील शिवाजी पार्क मेट्रो स्टेशनसह ८ मेट्रो स्थानकांना लक्ष्य करत भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिल्या. दिल्ली पोलिसांकडून भिंतीवरून भारतविरोधी घोषणा काढल्या जात आहेत.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, खलिस्तान जिंदाबादसोबतच सिख फॉर जस्टिस (SFJ) शी संबंधित लोकांनी मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर, पंजाब इज नॉट इंडिया असे ५ हून अधिक मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर लिहिले आहे. शिवाजी पार्क मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर लिहिलेल्या खलिस्तान समर्थक घोषणा दिल्ली पोलिसांनी हटवल्या आहेत. आता दिल्ली पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

जी-२० परिषदेपूर्वी SFJ म्हणजेच शीख फॉर जस्टिस (SFJ) या दहशतवादी संघटनेने दिल्लीत कारवाया केल्या आहेत. शीख फॉर जस्टिसशी संबंधित लोकांनी मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर खलिस्तान जिंदाबाद आणि दिल्ली भारताचा भाग नाही असे चित्र रेखाटले होते. खलिस्तान समर्थकांनी शिवाजी पार्क, मादीपूर, पश्चिम विहार, उद्योग नगर, महाराजा सूरजमल स्टेडियम, पंजाबी बाग आणि नांगलोई मेट्रो स्टेशनवर या घोषणा लिहिल्यात.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा