पुणे, २१ जुलै २०२२: आज सकाळपासूनच मायक्रोसॉफ्ट युजर्सना मोठी समस्या भेडसावत आहे. युजर्स Microsoft Teams वापरण्यास सक्षम नाहीत. सत्या नडेला यांच्या या कंपनीने सांगितले की, समस्या सोडवण्यासाठी काम केले जात आहे. युजर्स प्लॅटफॉर्म किंवा Microsoft Teamsच्या कोणत्याही फीचर्स मध्ये जाण्यास सक्षम नाहीत.
कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की या डाउनस्ट्रीम प्रभावामुळे, मायक्रोसॉफ्ट वर्ड, ऑफिस ऑनलाइन आणि शेअरपॉईंट ऑनलाइन सारख्या टीम्स इंटिग्रेशनसह येणाऱ्या अनेक Microsoft 365 सेवा प्रभावित झाल्या आहेत.
कंपनीने अधिकृत निवेदनात पुढे म्हटले आहे की वापरकर्ते Microsoft Teams किंवा कोणत्याही फीचर्स मध्ये प्रवेश करण्यास सक्षम नाहीत. या समस्येची चौकशी करत आहे. याबाबत अधिक अपडेट्स सर्व्हिस हेल्थ डॅशबोर्डवर पाहता येतील.
आउटेजचा मागोवा घेणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या मते, Microsoft Teams सकाळी ७ वाजल्यापासून डाउन आहे. वेबसाइटवरील अधिक युजर्स नी सांगितले की त्यांना टीम्स अॅपबाबत समस्या येत आहेत. इतर युजर्स नी सांगितले की त्यांना सर्व्हर कनेक्शनमध्ये समस्या येत आहेत.
मायक्रोसॉफ्टनेही ट्विटरवर याबाबत माहिती दिली. कंपनीने Microsoft 365 स्टेटस अकाउंट ला सांगितले की काही युजर्स अहवाल देत आहेत की ते अद्यतने तपासण्यासाठी एडमिन सेंटर मध्ये एक्सेस करू शकत नाहीत. टेक जायंटने सांगितले की ते या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे.
मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की इंटरनल स्टोरेज सर्विसमध्ये ब्रोकेज कनेक्शनची समस्या आहे, ज्यामुळे युजर्सना मॅसीव आउटेजचा सामना करावा लागत आहे. ते ट्रॅपिक ऑन हेल्दी सर्व्हिस डायरेक्ट करण्याचे काम करत आहे. कंपनीने हा आउटेज दुरुस्त करण्याबद्दल माहिती देताच, आम्ही ते येथे अपडेट करू आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे