नवी दिल्ली, १२ मे २०२३: दिल्ली क्राईम ब्रॅचने लॉरेन्स बिश्नोई गँगच्या आज मोठी कारवाई केली आहे. गोल्डी ब्रार- लॉरेन्स बिश्नोई गँगच्या तीन खंडणी टोळयांचा दिल्ली गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. बिश्नोई गँग अड्ड्यांवर छापा टाकत ७ जणांना अटक करण्यात आली असून, शस्त्रास्त्रे देखील जप्त केले आहेत.
दिल्ली गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या या कारवाईमध्ये एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळावरून ६ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. गोल्डी ब्रार-लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य खंडणीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर करतात, असे देखील दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.
पंजाबी गायक सिध्दू मुसेवालची हत्या आणि बॉलिवूड स्टार सलमान खानला धमकीचे पत्र दिल्याच्या आरोपांमुळे लॉरेन्स बिश्नोई गँग देशात पुन्हा एकदा चर्चेत आली. सिध्दूं मुसेवाल हत्येनंतर गोल्डी ब्रार-लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रमुख गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान लॉरेन्स बिश्नोई हा पोलीस कोठडीत असून, त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर