देशात दिवसाला १.४७ लाख पीपीई किट चे उत्पादन

नवी दिल्ली, १ मे २०२०: देशात पीपीई किट बाबत ववैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सतत तक्रार येत आहेत. दिवसेंदिवस याची मागणी वाढत चालली आहे या अनुषंगाने सरकारने पावले उचलली आहेत. भारताला जास्तीत जास्त २ कोटी पीपीई किट ची आवश्यकता आहे आणि २.२ कोटी पीपीई किट ची मागणी देखील करण्यात आली देण्यात आहे.

यापैकी देशातील कंपन्यांना १.४२ कोटींची मागणी केली गेली आहे. या मागणीला अनुसरून देशांतर्गत उत्पादन दिवसाला १.४७ लाख इतके होत आहे. विशेष म्हणजे देशातील उत्पादन जवळ जवळ शून्य होते ते आज १.४७ लाखापर्यंत पोहोचले आहे. उत्पादित होत असलेले पीपीई किट मिळण्यास सुरूवात देखील झाली आहे आणि राज्यांमध्ये ते वाटण्यास देखील सुरूवात झाली आहे.

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत सुद्धा आता हे काम सुरू करण्यात आले आहे. २२ मार्च पर्यंत देशात पीपीई किटचे उत्पादन करणाऱ्या केवळ दोन कंपन्या होत्या त्या वाढून आज १०७ कंपन्यांपर्यंत झाल्या आहेत. यासंदर्भातील कच्चामाल देखील मोठ्या प्रमाणावर मागवण्यात आला आहे. त्यामुळे आता देशांतर्गत सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादन होण्यास सुरुवात झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा