व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे : आमदार रोहित पवार

कर्जत दि.२९ मे२०२० : व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून व्यवसाय करावा, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड तालुक्यातील व्यावसायिक यांना केले आहे. यावेळी रोहित पवार म्हणाले की, गेली दोन महिने कोरोनांच्या प्रादुर्भावामुळे देशभरात सर्वत्र ताळेबंद सुरू आहे. ज्या ठिकाणी रूग्णांची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी फक्त अति आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मागील आठवड्यात रूग्ण सापडला होता. त्या मुळे तालुक्यातील वातावरणात हे अतिशय गंभीर झाले होते. सर्व व्यवहार आणि व्यवसाय हे पुर्णपणे बंद झाले होते. असे असताना गेली आठ दहा दिवसांपासून काही प्रमाणात व्यापारी वर्गास सुट दिली आहे.

यावर कर्जत येथे आमदार रोहित पवार यांनी व्यावसायिकांना साकाळी ९ ते ३ या वेळत दुकाने चालू ठेवण्यात सांगितले आहे. सामाजिक अंतर ठेऊन व्यावसायिकांनी दुकाने चालवावेत, असे सांगितले आहे. आरोग्याच्या सर्व सुविधांचा वापर करण्यात यावा,असे देखील सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा