पुणे. २८ जुलै २०२०: समाजीतील एक विशिष्ट समाज म्हणून बुधावार पेठेतील वेश्यांना पाहिले जाते. पण, या समाजाच्या घटकांचा समाजातील अनेक विकृतीला थांबविण्यात मोठा हात आहे. तर जेव्हाही देशावर संकट आले तेव्हा जमेल तसे यांनी आर्थिक मदत देखील केली. पण, कोरोना काळात त्यांच्या बरोबर होणारे वर्तन हे जरा वेगळेच आसल्याचे पहायला मिळत आहे.
पुण्यातील बुधवार पेठ हे कोरोना मुक्त झालेला भाग होता आणि नंतर हळूहळू तिथे वेश्या व्यवसायाला सुरुवात देखील झाली होती. याच पार्श्वभूमीवर बुधवार पेठेत परत आता ५ नवे कोरोना रुग्ण आढळले. यामध्ये ३ फेरीवाल्यांचा समावेश आहे. तर इतर २ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत. एका व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आलं आहे. तर ४ व्यक्तींचा पॉझिटीव्ह अवाहाल येऊन देखील औषधं देऊन त्यांना घरी पाठवले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ४ या व्यक्तींच्या घरात माणसं आहेत. त्यातच बुधवार पेठेतील वस्तीची रचना अत्यंत चिंचोळी आसल्याचे पहायला मिळते.
या ४ व्यक्तींमुळे घरातील इतर लोकांना आणि आजुबाजूच्या व्यक्तींनाही कोरोना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष गोष्ट म्हणजे कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेल्या या दोनही महिला सेक्स वर्कर आहेत. त्यामुळे प्रशासनानं तातडीने या महिलांना रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचं आहे. पण डॉक्टरांनी रुग्णांना औषधं देऊन घरी क्वारंन्टाईन होण्यास सांगितलं आहे. बुधवार पेठेत त्यांची क्वारंटाईनची स्वत:ची अशी व्यवस्था नाही. त्यातच बुधवार पेठेत कोरोनाचे रुग्ण आढळले तर सर्व वेश्या व्यवसाय बंद पडून पुन्हा एकदा या महिलांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर येऊन उभा राहू शकतो. त्यामुळं प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष द्यावं अशी मागणी कायाकल्प संस्थेच्या सारिका यांनी केली आहे.
कोरोनाचा काळ हा फार वाईट असून प्रशासन देखील युद्ध पातळी कार्य करत आहे. पण माणसातला माणुस हा फार कमी पहायला मिळतो. त्यात आरोग्य कर्मचारी यांच्यावरही ताण मोठ्या प्रमाणात पडत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी