छत्रपती संभाजीनगर येथे ठाकरे गटातर्फे गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन

6

छत्रपती संभाजीनगर, २ मार्च २०२३ : ता. १ मार्चपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरामध्येही वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारतर्फे घरगुती गॅसमध्ये ५० रुपयांची आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल ३५०.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारद्वारे घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे बजेट पूर्णतः विस्कळित झाले असून, या दरवाढीविरोधात बुधवारी (ता. १) छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिर परिसर येथे केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला आहे. ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘ईडी सरकार हाय हाय’, ‘केंद्र सरकार हाय हाय’ अशाप्रकारे घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवणी यांच्यासह मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा