पुणे, ०९ ऑक्टोबर २०२०: उत्तरप्रदेश येथे हाथरस या ठिकाणी एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व महाराष्ट्रातील विविध दलित संघटनांच्या प्रमुखांकडून आज निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे. व स्थानिक पोलिस प्रशासनाने जी भूमिका बजावली पाहिजे होती, ती त्यांच्याकडून बजावली गेली नाही व अतिशय निंदनीय व चिंतेची बाब आहे असे बोलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर आंदोलन करून उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना निवेदन देण्यात आले आहे.
उत्तरप्रदेश मधील ज्या उच्चवर्णीय पुरुषी मानसिकतेमुळे दलित स्त्रीच्या शरीराची लचके तोडण्याची वृत्ती कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही व १९ वर्षीय दलित मुलीच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे पुन्हा ठळकपणे समोर आले आहे. असे असताना पिडीतेचा जबाबही दाबण्याचा प्रकार करण्यात आला आहे. व जातीनिहाय आरोपींना मिळणारे संरक्षण परंपरेने चालत आले आहे. व अत्याचार झालाच नाही असा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करणे, व पोलिसांनी परस्पर पीडितेच्या मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करून पुरावे संपवले, पीडितेच्या कुटुंबाला नजर कैदेत ठेवणे, व माध्यमांना त्यांच्यापर्यंत पोहोचू न देणे या गोष्टी जातीयवादी धर्मत शक्तीचे आहे. उत्तर प्रदेश सरकारची नियत सिद्ध करतात याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
तसेच हाथरस येतील सामूहीक बलात्कारातील आरोपींना तेथील डीएम, स्थानिक डॉक्टर, पोलीस अधिकारी यांनी बलात्कार करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून भाजपा सरकारच्या सांगण्यावरून भूमिका बजावली आहे. ती मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. ही घटना प्रवृत्तीच्या उच्चवर्णीय नराधमांनी घडवून आणली त्यांच्यावर आणि यामध्ये संपूर्ण घटनेमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले अशा सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र मातंग समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना निवेदन देऊन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
यावेळी रमेश दादा बागवे, सुभाष जगताप, बाळासाहेब भांडे, हनुमंत साठे, विजय टाकले, मनोज कांबळे, अविनाश बागडे, अनिल नीलेश वाघमारे, विठ्ठल थोरात, सुरेखा खंडाळे, व सदस्य यांची उपस्थितीती होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे