म्यानमारमध्ये तख्तापलट विरोधात निदर्शन

म्यानमार ८ फेब्रुवारी २०२१ : सैन्यदलानंतर म्यानमारमध्ये निदर्शकांची संख्या वाढत आहे. हे निदर्शक देशातील सर्वोच्च नेते ऑंग सॅन सू यांच्या सुटकेची मागणी करत आहेत. याच अनुक्रमे रविवारी म्यानमारमधील सर्वात मोठे शहर यांगून येथे सैन्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. यंगून विद्यापीठाजवळ ३०००० हून अधिक लोक जमले आणि  विरोध केले.
यावेळी लोकांनी ‘तुमचे आयुष्य दीर्घ होवो  मा सु ‘ आणि ‘मिलिटरी हुकूमशाहीची समाप्ती’ अशा घोषणा दिल्या. लोक मुख्य रस्त्याकडे निघाले. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. त्याचवेळी वाहनचालकांनीही हॉर्न  वाजवून निदर्शकांना साथ दिली.
या अहवालानुसार सैन्याने फेसबुक आणि ट्विटर सारख्या इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्म रोखण्याचे आदेश दिले होते, परंतु देशातील काही भागात ते अर्धवट पुनर्संचयित केले गेले. इंटरनेट शटडाऊनवर नजर ठेवणाऱ्या लंडनस्तिथ  नेटब्लॉकने रविवारी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अंशतः बहाल करण्याचे सांगितले .
न्युज अनकट प्रतिनिधी : एस राऊत

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा