प्राथम‌िक आरोग्य केंद्रांतून चांगल्या वैद्यकीय सुविधा द्या: जि प.सदस्या रोहिणीताई ढवळे

बेंबळे (माढा, सोलापूर), दि. २० जून २०२०: कोरोना विषाणु संक्रमणाच्या संकटकाळात लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातुन चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील असून आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यामुळे लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातुन चांगल्या वैद्यकीय सुविधा द्याव्यात असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई तुकाराम ढवळे यांनी परिते प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेल्या भेटीदरम्यान केले.

त्यांनी गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे जिल्हा परिषद गटातील परिते प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन थर्मल स्कॅनर मशीन, पल्स अॉक्सिमिटर, ग्लोब, मास्क, सॅनिटायझर, पीएचसी एलए सॅनिटायझिंग मशीन, ब्लड प्रेशर उपकरण संच, नेबुलिझर, ग्लोव्हज, स्टेथोस्कोप, इत्यादी साहित्य अंगणवाडी सेविका, आशा सेविका व आरोग्य केंद्रास उपलब्ध करून दिले.

यावेळी रोहिणीताई ढवळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. तसेच कोविड १९ संदर्भातील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत सर्व गावांची माहिती जाणून घेतली. कोरोना संदर्भातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी खबरदारी घेऊन काम करण्याची सूचना दिल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करत असताना येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली. तसेच आरोग्य केंद्रातील कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.पी.भारती, डॉ. सातपुते, प्राध्यापक दयानंद खटके-पाटिल, आशा सेविका, आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा