मुंबई, ६ नोव्हेंबर २०२०: राज्यातल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७ कोटी ५६ लाख रुपयांची तरतूद केली, असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.
यासंदर्भात आरोग्य विभागाने काल शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना १ जुलै २०२० पासून प्रत्येकी २ हजार आणि ३ हजार रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्याचा त्या कणा आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार त्यांच्या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष देत असल्याचे ते म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी