PUBG गेम खेळल्याने अजित पवार यांच्या डोक्यावर परिणाम

पुणे जिल्ह्यासह राज्यात चर्चेला आले उधाण 

पुणे : PUBG’ गेम खेळून अजित पवार यांच्या डोक्यावर परिणाम’ ही बातमी आणि घटना पुणे जिल्ह्यात सध्या भलतीच चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार या नावामुळे आणि पब्जी गेमच्या खेळामुळे ही चर्चा सुरु झाली आहे. परंतू, महाराष्ट्रात प्रभावी असलेल्या तसेच, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असलेल्या ‘त्या’ नेत्याच्या नावाशी या अजित पवारांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे गैरसमज नसावा. PUBG गेम खेळण्याने डोक्यावर परिणाम झालेले अजित पवार हे मूळचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर
तालुक्यातील टेंभुर्णी गावचे ते रहिवासी आहेत.

त्याच्या कुटुंबियांनी त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करण्याची तयारी दाखवली आहे. सोमवारी सकाळी पब्जी गेममध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने गेममध्ये दिल्या जाणाऱ्या कमेंट्सचा वापर तरुणाने आपल्या सामान्य आयुष्यात केला. आज या तरूणाने चाकणच्या रस्त्यावर जाऊन पब्जी गेममध्ये येणारे कमेंट्स नागरिकांना उद्देशून वापरल्या.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, त्याने स्वत: मोबाईल दगडाने फोडला. मित्रांना भेटून म्हणाला, मला दोनशे माणसे मारायला आली आहेत. तो रस्त्यांवर मुलांच्या सायकलीवर बसायचा आणि त्यांना त्रास देत होता. एका मिनिटांत अख्खी बिल्डिंग उडवून टाकतो, असे तो म्हणत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच तो पबजी मध्ये असलेल्या अ‍ॅक्शन करत गावात फिरत होता. लोकांना दगडं मारत होता. यानंतर घटनेची माहिती चाकण पोलिसांना देण्यात आली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा