नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर २०२०: पब्जी मोबाइल भारतात परत येत आहे. दक्षिण कोरियाची कंपनी पब्जी कॉर्पोरेशननं जाहीर केलं आहे की, ही कंपनी भारतीय बाजारासाठी एक नवीन गेम घेऊन येत आहे, जी केवळ भारतासाठी बनवली गेली आहे. यावेळी कंपनी चिनी कंपनीबरोबर कोणतीही भागीदारी करणार नाही.
पब्जी कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार ‘पब्जी मोबाइल इंडिया’ भारतात सुरू होईल. कंपनीनं म्हटलं आहे की हे नवीन अॅप डेटा सुरक्षेचं चांगल्या प्रकारे पालन करंल. कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करण्यासही तयार आहे.
पब्जी कॉर्पोरेशननं प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, ‘दक्षिण कोरियाची कंपनी क्राफ्टनची उपकंपनी असलेल्या प्लेअर्स अंनोन बॅटलग्राउंड केटर पब्जी कॉर्पोरेशननं आज जाहीर केलं की भारतात पब्जी मोबाइल इंडिया सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
पब्जी कॉर्पोरेशनच्या मते, पब्जी मोबाइल इंडिया खास भारतासाठी डिझाइन केलेले आहे. तसंच वापरकर्त्यांना सुरक्षित आणि निरोगी खेळ खेळण्याची संधी मिळंल असेही कंपनीनं म्हटलं आहे.
पब्जी कॉर्पोरेशननंही जाहीर केलं आहे की ही कंपनी खेळाडूंशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्यासाठी एक उप-सहायक कंपनी तयार करंल. भारताची पब्जी कंपनी १०० कर्मचारी ठेवंल. यासाठी स्थानिक कार्यालये तयार केली जातील आणि स्थानिक व्यवसायाच्या निमित्ताने कंपनी येथे गेमिंग सेवा चालवेल.
पब्जी कॉर्पोरेशनची मूळ कंपनी क्राफ्टन इंकनं भारतात १०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. स्थानिक गुंतवणूक, ई स्पोर्ट, एंटरटेनमेंट व आयटी उद्योगात ही गुंतवणूक केली जाईल. ही गुंतवणूक भारतातील कोणत्याही कोरियन कंपनीनं केलेली सर्वात मोठी गुंतवणूक असंल, असा कंपनीचा दावा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे