इंदापूर नगर परिषदेच्या वतीने वसुंधरा अभियानांतर्गत जनजागृती…

इंदापूर, १५ फेब्रुवरी २०२१: शहरातील नागरिकांमध्ये अग्नी वायू जल ऊर्जा व आकाश या पंचतत्त्वांची जनजागृती होऊन वसुंधरेला प्रदूषण मुक्त करण्यासाठी ऊर्जा बचत करणे साठी सौर ऊर्जेचा वापर करणे, मोटर्स गाड्या मुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सायकलचा वापर करणे, या वसुंधरेला हिरवाईने नटवण्यासाठी वृक्षारोपण करण्यासाठी त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांसाठी नागरिकांनी एक तरी झाड लावावे.

या उद्देशाने इंदापूर नगर परिषद कार्यालयासमोरील प्रंगणा मध्ये सायकल विक्री स्टॉल, वृक्ष विक्री स्टॉल, सौर ऊर्जा दिवा विक्री स्टॉल व सोलर पॅनल विक्री स्टॉलउभे केले होते या स्टॉल चे इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपस्थित नागरिकांना माझी वसुंधरा ची शपथ श्रद्धा वळवडे यांनी दिली. त्यानंतर सर्व स्टॉल मालकांचा नगराध्यक्ष अंकिता शहा यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष यांनी सांगितले की नागरिकांनी आपल्या वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे. विज बचत करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करावा. आपले आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी तसेच प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी मोटरसायकलच्या वापर न करता सायकलचा वापर करावा व इतर माहिती दिली.

सोलर वॉटर हीटर साठी विश्व एजन्सिज प्रोप्रायटर शैलेश घोरपडे यांनी स्टॉल उभा केला होता, वृक्ष विक्रीसाठी देशपांडे नर्सरीचे उदय देशपांडे यांनी स्टॉल उभा केला होता, सोलर एलईडी लाईट विक्रीसाठी श्री दिनकर गायकवाड यांनी स्टॉल उभा केला होता तसेच सायकल विक्री साठी सोनल सायकल मॉल चे शिंदे यांनी केला होता.

यावेळी इंदापूर तालुका प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, सामाजिक कार्यकर्ते हमीद आतार, प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षिरसागर, अलताब पठाण, आरोग्य निरीक्षक मनोज बारटक्के, गोरक्षनाथ वायाल, सहाय्यक आरोग्य निरीक्षक श्री लीलाचंद पोळ, सुनील लोहिरे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा