बारामतीत शिवसैनिकांकडून कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध

बारामती, ९ ऑगस्ट २०२०: बारामती शहर शिवसेनेच्या वतीने आज रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने जिल्हाप्रमुख ऍड. राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली भिगवण चौक येथे तीव्र आंदोलन छेडण्यात आले. तसेच कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्याने मारून, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कर्नाटक सरकारचा निषेध असे, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.

बारामती शिवसेनेने आज भिगवण चौकात कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे म्हणाले – एकमेव विश्वव्यापी हिंदुवादी पक्षाची सत्ता आसणाऱ्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुका मणगुत्ती गावात २ दिवसांपूर्वी अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तेथील काही स्थानिक लोकांनी आणि तथाकथित प्रादेशिक अस्मिता मिरवणाऱ्या संघटनांनी या प्रतिष्ठापणेला तीव्र विरोध केला आणि कर्नाटक प्रशासनाने त्यांची बाजू घेत, रात्री ही मूर्ती हटवली. या प्रकरणी सर्व शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन कर्नाटक प्रशासनाने समाजकंटक लोकांवर कायदेशीर कारवाही करावी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सन्मानपूर्वक करावी, अशी पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेच्या बारामती तालुका पदाधिकाऱ्यांना अटक करून शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.  यावेळी समन्वयक भीमराव आप्पा भोसले, तालुकाप्रमुख विश्‍वास मांढरे, राजेंद्र पिंगळे, निलेश मदने, सतीश अण्णा काटे, पप्पू माने,सर्वेश वाघ, सुभाष वाघ, निखिल देवकाते,उमेश दुबे, रंगनाथ निकम, अविनाश कदम, आदेश काळे, शौकत बागवान, राजेंद्र गलांडे, सूर्यकांता आगम, तानाजी गायकवाड, विजय हिरवे, निखिल देवकाते, गोकुळ रेडे या कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा