मुंबई : तसे पाहता २०१९ हे वर्ष बॉलिवूडसाठी चांगले राहिले. यावर्षी अनेक नव्या चिनेत्रपटांनी मनोरंजन विश्वात भर घातली असली तरी येत्या वर्षीदेखील अनेक नवीन बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जाणून घेऊयात त्याविषयी…
◆तान्हाजी : द अनसंग वॉरिअर : या चित्रपटात अजय देवगण, सैफ अलीखान, शरद केळकर, काजल यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.
◆ छपाक : मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ या चित्रपटात ऍसिड अटक सर्व्हायवर मालती हिच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे.
◆लव्ह आजकल २ : या चित्रपटात, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे.
◆ सूर्यवंशी : या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार व अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत झळकणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे.
◆83 : क्रिकेटपटू कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात रणवीरसिंग व दीपिका पदुकोण प्रमुख भूमिका निभावणार आहेत.
◆राधे : या चित्रपटात सलमान खान, दिशा पाटणी, टायगर श्रॉफ हे अभिनेते झळकणार आहेत.
◆लक्ष्मी बॉम्ब : अक्षय कुमारने आधीच त्याच्या आगामी हॉरर-कॉमेडी लक्ष्मी बॉम्बमुळे चर्चेत आहे. यात तो ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे.
◆ गंगूबाई काठियावाडी : पत्रकार हुसेन झैदी लिखित ‘क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित या चित्रपटात आलिया भट प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
◆ पृथ्वीराज : ऐतिहासिक योद्धा सम्राट पृथ्वीराज चौहान याच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार हा मानुषी छिल्लरसोबत झळकणार आहे.
◆लाल सिंग चड्डा : टॉम हॅन्क्सच्या ऑस्कर-विनिंग ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये लाल सिंह चड्डाच्या भूमिकेत अभिनेता अमीर खान दिसणार आहे. यासोबतच करीना कपूर, विजय सेतुपति आणि मोना सिंग हेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.















































