पुणे आणि मुंबई विद्यापीठाला मिळणार नवे कुलगुरू, कुलगुरू पदाच्या संभाव्य नावांची यादी राज्यपालांना सादर

मुंबई, २७ मे २०२३ : पुणे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पद मागील काही महिन्यांपासून रिक्त होते. मागील आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या आणि त्याआधी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्यानंतर यातील पाच नावे राज्यपालांकडे पाठवली आहेत.कुलगुरू पदासाठी चर्चेत असलेल्या दोन ते तीन नावांवर निवडीआधीच प्राध्यापक संघटनांकडून आक्षेप घेतला होता. त्यामुळे कुलगुरुपद कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेमध्ये ८० जण सहभागी झाले होते. त्यातील २० जणांच्या मुलाखती निवड समितीने मागील आठवड्यात घेतल्या. त्यानंतर त्यातील पाच नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत. या पाच नावांपैकी एका नावाची राज्यपाल कुलगुरू म्हणून निवड करतील. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीने २७ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर पाच नावे निश्चित करून राज्यपाल कार्यालयाला पाठवण्यात आली आहेत.

मुंबई विद्यापीठाची संभाव्य नावे पुढील प्रमाणे आहेत.
प्रा. रवींद्र कुलकर्णी – मुंबई विद्यापीठाची माजी प्रभारी कुलगुरू म्हणून यांनी काम केला आहे, सुरेश गोसावी – भौतिक शास्त्राचे प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,तेज प्रताप सिंग – बीएचयु ( बनारस हिंदू विद्यापीठ), राज्यशास्त्राचे प्राध्यापक,ज्योती जाधव – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट,अर्चना शर्मा – भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर

तर पुणे विद्यापीठाची संभाव्य नावे पुढील प्रमाणे आहेत.
डॉ. पराग काळकर – सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता, प्रा. अविनाश कुंभार – विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग,
डॉ.संजय ढोले – भौतिकशास्त्र विभाग, प्रा. सुरेश गोसावी – पर्यावरण शास्त्र विभाग, डॉ. विजय फुलारी – कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग

न्यूज अनकट प्रतिनिधी – खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा