गोल पोस्ट गुन्हा पुण्यात छोटा राजनच्या पुतणीने मागितली खंडणी

पुण्यात छोटा राजनच्या पुतणीने मागितली खंडणी

पुणे : कुख्यात गुंड छोटा राजनच्या पुतणीने साथीदारांच्या मदतीने पुण्यात ५० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी पुतणीने शहरातील एक तरुणाकडे ही खंडणी मागितली आहे. पुणे गुन्हे शाखेने खंडणी घेताना एकाला पकडले आहे.याप्रकरणी तिघांविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेने आपल्या दोन साथीदारांसह हा खंडणीचा कट रचला होता. त्यातील एक जण खंडणी घेण्यासाठी अरोरा टॉवर परिसरात आला होता. २५ लाखांची खंडणी घेताना त्याला पुणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आणि चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरुणाने खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचून खंडणी प्रकरणातील एकाला अटक केली आहे.
तक्रारदार तरुणाची पत्नी आणि मेहुणी यांचा अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी कुख्यात गुंड छोटा राजनच्या पुतणीने आपल्या दोन साथीदारांसोबत संगनमत करून तक्रारदारविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांच्यात वाद सुरू झाला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रियदर्शनी निकाळजेनं ५० लाखांची खंडणी मागितली होती.याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version