Pune : पुणे शहर तहसील कार्यालयाच्यावतीने १७ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० या कालावधीत पिंगळे वस्ती मुंढवा येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
मा. मुख्यमंत्री यांनी सामान्य नागरिकांचे दैनदिन जीवन सुकर व्हावे याकरीता सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. याअंतर्गत नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासोबतच त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिवस हा शासन आपले दारी म्हणून आयोजित करण्यात करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी लोकशाही दिनाच्या दिवशीच आपल्या समस्याबाबत लेखी स्वरुपात अर्ज सादर करावेत, असे आवाहन पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, वैभव वायकर