Pune City to Get 5 New Police Stations, 1,000 Additional Cops!
पुणे, ९ ऑगस्ट २०२५ – पुणेकरांनो, आता गुन्हेगारांची खैर नाही! शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जाहीर केलं – पुण्यात लवकरच ५ नवी पोलिस ठाणी आणि तब्बल १,००० तडफदार पोलिसांची फौज दाखल होणार!
लक्ष द्या कुठे उघडणार नवी ठाणी:
लोहगाव, नन्हे-लक्ष्मणनगर, मांजरी, येवलेवाडी आणि कोंढवा — या भागात आता पोलिसांचा थेट पहारा, गुन्हेगारांसाठी ‘नो-गो’ झोन!
फडणवीसांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील उद्घाटन सोहळ्यात आणखी धडाकेबाज घोषणा केल्या — मागील तीन वर्षांत पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल ₹१,००० कोटींपेक्षा जास्त खर्च मंजूर!
- पोलिस आयुक्तालयासाठी नवी २०० कोटींची इमार
- १५० नवी ‘तडाखेबाज’ वाहने
- अत्याधुनिक एआय कॅमेऱ्यांसह ‘दृष्टी’ कमांड अँड कंट्रोल सेंटर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २२,००० कोटींच्या जिल्हा नियोजन समिती निधीतून तब्बल ५% रक्कम पोलिस दलासाठी राखीव ठेवण्याचा इशारा देत, पुणे पोलिसांना सुपरहाय-टेक बनवण्याचा भक्कम पाया रचला आहे. ‘दृष्टी’ या अत्याधुनिक एआय प्रणालीमुळे वाहतूक असो वा गुन्हेगारी, सगळं थेट पोलिसांच्या रडारवर राहणार असून, कायदा मोडला की कारवाई वीजेच्या गतीने होणार आहे. गुन्ह्यांचे विश्लेषण, गुन्हेगारांची ओळख, वाहनांची तपासणी आणि घटनास्थळावर त्वरित पोहोचण्याची क्षमता यामुळे पुणे पोलिसांचे जाळे आणखी मजबूत होणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना सुरक्षिततेची नवी हमी मिळेल, तर गुन्हेगारांसाठी पुणे शहर होणार ‘नो-गो’ झोन. थोडक्यात, पुणे सज्ज आहे ‘ऑपरेशन सुरक्षित पुणे’साठी.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































