पुणे, २९ एप्रिल २०२०: देशांमध्ये सर्वात जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. त्यातही मुंबई-पुण्यासारखे शहर हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहे. पुण्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर देशातील सर्वात पहिला रुग्ण पुण्यामध्ये आढळला होता. त्यानंतर प्रशासनाने त्वरित पावले उचलत कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत स्वॅप टेस्टिंग चालू केले होते. याचा फायदा होताना आता दिसत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत आहे तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.
यासंबंधात आज मा. मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे माहिती दिली. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, गेल्या दीड महिन्यापासून आपण या संकटाचा सामना करत आहोत. पुणेकरांच्या सहाय्याने आणि प्रशासनाच्या मदतीने आपण यावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होत आहोत. पुण्यातील दाट वस्ती असलेल्या तसेच झोपडपट्टी भागातील लोकांची लवकरात लवकर चाचणी करून आपण असे रुग्ण पहिल्या टप्प्यातच ओळखण्यात यशस्वी झालो आहोत.
पुढे ते म्हणाले की, पुण्यामध्ये गेल्या महिन्यात मृत्यूचा दर हा १४.५ टक्के एवढा होता आता तो कमी होऊन ७.५ टक्क्यांवर येऊन पोचला आहे. याच प्रकारे आपण सोशल डिस्टन्स आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले तर आपण या परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवू. आत्तापर्यंत १७५० लोक क्वारंटाईन केली गेलेली आहेत. अशाच प्रकारे पुणेकरांनी सहकार्य केले तर पुणे कोरोना मुक्त होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी