पुणे: शहरात अमली पदार्थांविरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गांजा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. युनिट ७ च्या पथकाने तब्बल ७२ किलो कमर्शियल क्वांटिटी गांजा जप्त करत चार आरोपींना अटक केली असून १९ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.दि. १३ मार्च २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांचे पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांना गुप्त माहिती मिळाली. पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर (पिवळ्या नंबर प्लेटसह) कारमधून गांजा विक्रीसाठी पुण्यात आणला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांना देण्यात आली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने वाडेबोल्हाई येथील बोल्हाईमाता मंदिराजवळ सापळा रचला. संशयित कार दिसताच पोलिसांनी ती थांबवून झडती घेतली असता कारच्या डिकीत चार पोत्यांमध्ये भरलेला ५८.५८ किलो गांजा २९ प्लास्टिक पॅकेटमध्ये सापडला. यासह कार जप्त करण्यात आली.अटक करण्यात आलेले आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील असून त्यांची नावे:भिवा कालिदास वाघमोडेविष्णु भागवत वाघमोडेहरि श्रीपती ढवळेमनोज अनिल सुरवसेचौकशीत आरोपींनी हा गांजा पुण्यात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. पुढील तपासात आरोपी भिवा वाघमोडे याच्या करमाळा तालुक्यातील धायखिंडी येथील घरावर छापा टाकण्यात आला. तेथून आणखी १४ किलो गांजा (किंमत २.९३ लाख रुपये) जप्त करण्यात आला.यामुळे या कारवाईत एकूण:७२ किलो गांजा (कमर्शियल क्वांटिटी)१९,९३,८०० रुपयांचा मुद्देमालस्विफ्ट डिझायर कारजप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गु.र. नं. ९३/२०२६ दाखल करण्यात आला असून NDPS कायदा कलम 8(c), 20(b)(ii)(C), 29 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उप आयुक्त निखिल पिंगळे आणि सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा युनिट ७ चे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.













































