पुणे शहरात डेंग्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. ऑगस्ट महिन्यात ७४७ संशयित रुग्णांची नोंद झाली असून, निश्चित डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८ पर्यंत पोहोचली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या तपासणीत ऑगस्ट महिन्यात ३९४ ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती आढळली, ज्यामुळे घरातच डासांची पैदास होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ दिसून येत आहे.
महापालिकेने नागरिकांना आठवड्यातून एकदा ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आणि घरातील साठलेल्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे. या उपाययोजनांनीच डेंग्यूचा प्रसार रोखता येईल आणि शहरात सुरक्षितता राखता येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे












































