पुणे जिल्ह्यातील दरडप्रवण आणि पूरप्रवण गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना

पुणे, २ जुलै २०२३ : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगडाजवळ असलेल्या इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात १०० हून अधिक दाबले गेले आहेत. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी सुरु असल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील दरडप्रवण आणि पूरप्रवण गावांवर जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. तसेच दरड आणि पूरप्रवण गावांशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयात थांबण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी संभाव्य भीती लक्षात घेता विविध खातेप्रमुखांची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला.

पुणे जिल्ह्यातील २३ गावांवर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. या गावांवर दरड कोसळण्याची शक्यता आहे. तसेच ८४ गावे पूरप्रवणग्रस्त आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे या गावाशी संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच यंत्रणा किती सज्ज ठेवली आहे, त्याची माहिती घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील पाऊस, संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

न्यूज अनकट प्रतिनिधी अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा