पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजे मुक्त दहिहंडीचा थरार

“Punekars enjoyed the excitement of Punit Balan Group’s DJ-free joint Dahi Handi.”

ऐतिहासिक लाल महाल चौकात दहीहंडीचा थरार उडाला. ढोल-ताशा, वरळी बिट्सच्या तालावर तरुणाई थिरकली, बँड आणि महाकाल नृत्याने रंगत वाढवली. हजारो पुणेकरांच्या साक्षीने राधेकृष्ण ग्रुपने तब्बल सात थर रचून हंडी फोडली आणि दहीहंडीचा बहुमान पटकावला.

यंदा खास आकर्षण होतं – महाराष्ट्रातील पहिलीच “डीजे मुक्त दहीहंडी”. पुणेकरांनी या प्रयोगाला जबरदस्त प्रतिसाद देत गर्दीतही पारंपारिक वाद्यांच्या गजरात दहीहंडीचा आनंद लुटला.

पुनीत बालन ग्रुपच्या पुढाकाराने 26 गणेश मंडळं एकत्र आली आणि हा उत्सव साजरा झाला. डीजे टाळल्यामुळे ध्वनीप्रदूषण कमी झालं आणि ढोल-ताशा, बँडवाल्यांना रोजगार मिळाला.

अभिनेता प्रविण तरडे, हार्दिक जोशी, बिग बॉस फेम ईरिना यांसह अनेक मराठी कलाकारांनीही उपस्थित राहून उत्सवात रंग भरला.

👉 पुनीत बालन म्हणाले :
“पुणेकरांनी डीजे मुक्त दहीहंडीला दिलेला प्रतिसाद अप्रतिम आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आम्ही गेल्या वर्षी संयुक्त दहीहंडीची सुरुवात केली. यावर्षी डीजेमुक्त परंपरा पुढे नेत ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवलं आणि पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन दिलं.”